सातारा जिल्ह्यात सात बाधितांचा मृत्यू

दिलीपकुमार चिंचकर
Saturday, 17 October 2020

सातारा जिल्ह्यात 24 तासांत 271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे

सातारा : सातारा जिल्ह्यात 24 तासांत 271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या खिंडवाडी ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, चौर खेड ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष, अदित्यनगरी ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ पोवई नाका ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, वाडे ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, अशा  एकूण सात कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने   168785
एकूण बाधित              42969  
घरी सोडण्यात आलेले  34774
मृत्यू                           1415
उपचारार्थ रुग्ण             6780

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven corona patients have died in Satara district

Tags
टॉपिकस
Topic Tags: