Gas Cylinder Explosion : कऱ्हाडमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत सातजण गंभीर जखमी, चार महिलांचा समावेश

आगीच्या घटनेतील जखमी झालेल्यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Gas Cylinder Explosion
Gas Cylinder Explosionesakal
Summary

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह (Fire Brigade) पोलिसही त्वरित घटनास्थळी पोचल्याने तेथे मदतकार्य राबविण्याचे काम सुरू होते.

कऱ्हाड : स्वयंपाकाचा सिलिंडर लिकेज होऊन गॅस गळतीने झालेल्या स्फोटासह (Cylinder Explosion) आगीत सात जण जखमी झाले. येथील बुधवार पेठेतील महात्मा फुले नगर येथे रात्री दहाच्या सुमारास घटना घडली.

आगीच्या घटनेतील जखमी झालेल्यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह (Fire Brigade) पोलिसही त्वरित घटनास्थळी पोचल्याने तेथे मदतकार्य राबविण्याचे काम सुरू होते.

Gas Cylinder Explosion
गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश, सोनोग्राफी मशिनच्या पिशवीत सापडले हळदी-कुंक, लिंबू; बनावट डॉक्टर पसार

अनिता सुनील मोरे, उमेश आबा दुबळे, संगीता सदाशिव भोसले, अमोल सदाशिव भोसले, किरण राजू बडेकर, मालन राजाराम भोसले व मालन दत्तू मोरे अशी जखमींचा नावे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com