
सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे दहा लाख ५० हजार रुपये किमतीचे ४२ मोबाईल नागरिकांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांच्या हरविलेल्या मोबाईल शोध घेण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी करत होते.