'वय 70, ऑक्‍सिजन लेव्हल 80 अशा बिकट स्थितीत कोरोनाशी केले दोन हात' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

'वय 70, ऑक्‍सिजन लेव्हल 80 अशा बिकट स्थितीत कोरोनाशी केले दोन हात'

सातारा : शेती मुख्य व्यवसाय असलेल्या कुटुंबातील एक-दोन नव्हे तर माझ्यासहित 14 जणांना कोरोनाने (Coronavirus) ग्रासले होते. त्यात माझे वय 70. सर्वांत जास्त. त्या सगळ्यात मीच एकटी फक्त कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital) उपचारासाठी दाखल होते. वय 70 तर, ऑक्‍सिजन लेव्हल 80. अशा बिकट स्थितीत कोरोनाशी दोन हात करत होते. त्यातच रुग्णालयात पाय घसरून पडले. डोक्‍याला मार लागला. त्यामुळे सिटी स्कॅनचेही टेन्शन कोरोनाच्या सोबतीला चिकटल्याचे शैलजा इनामदार सांगतात. (Shailja Inamdar Of Karad Fight The Coronavirus Satara News)

पुढे इनामदार सांगतात, त्या काळात मुले काळजी घेत होतीच. त्यांच्यासह अन्य सदस्य होम आयसोलेट होते. त्यातून रुग्णालयात तपासण्यासाठी मुले आली. माजी बिकट स्थिती पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या रडण्यानेही त्यावेळी मी सद्‌गदीत झाले. मात्र, त्याचवेळी कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला. दुसऱ्या दिवसापासून सकारात्मक विचार सुरू केला. पुतणीच्या लग्नाचा विचार मनात आणला. अन्य नातवांचाही विचार मनात आणून स्वतःला कव्हर केले. सकारात्मक विचाराने ऑक्‍सिजन लेव्हल 80 वरून थेट 91 ते 94 वर गेली. अशक्तपणा होता. मात्र, पुढच्या काही दिवसांत आत्मविश्वासाने कोरोनावर मात केली.

काेराेनाचा विस्फाेट : बाप रे! केंद्राच्या यादीत महाराष्ट्रातील दाेन जिल्ह्यांचा समावेश

खानापूर तालुक्‍यातील हिंगणगादी गावाकडे आमची शेती आहे. तिकडे जाणे-येणे आहे. त्यातूनच बरीच काळजी घेऊनही मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर घरातील सारेच सदस्य कोरोनाबाधित झाले. त्यात 4 लहान मुलांसह 14 जणांचा समावेश होता. घरात अचानक झालेल्या कोरोनाच्या एन्ट्रीने सारे हादरले होते. मात्र, त्यावेळीच आई म्हणून खंबीरपणे कोरोनाचा मुकाबला केला. सकस आहार, सकारात्मक मानसिकता अन्‌ सात्विक संवाद अशी त्रिसूत्री रुग्णालयात ठेवली. काही कालावधीसाठी ऑक्‍सिजन लेव्हल कमी-जास्त होत असल्याने टेन्शन होते. त्यावरही सकारात्मकतेने मात केली.

वयोमानाने झालेला त्रास सहन करावा लागला. कृष्णा हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते. बाकी सारे होम आयसोलेट होते. त्यावेळी डॉ. संजय भागवत यांनी केलेल्या तपासणीत कुटुंबातील सदस्य कोरोनामुक्त झाले. त्यामुळेही रुग्णालयात मीही धीटपणे कोरोनाशी मुकाबला केला. आहार, विचार व सकारात्मकता कटाक्षाने पाळली. त्यामुळे अधिक गतीने बरे होण्यास मदत झाली. आख्खं 14 जणांचे कुटुंब पॉझिटिव्ह होते. मात्र, कोणीच डगमगले नव्हते. कृष्णा हॉस्पिटलला उपचार घेतानाही खंबीर राहिल्याने वयाच्या सत्तरीतही कोरोनावर मात करता आली.

Shailja Inamdar Of Karad Fight The Coronavirus Satara News

Web Title: Shailja Inamdar Of Karad Fight The Coronavirus Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top