मोरगिरी : ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि विविधता यांनी समृद्ध असलेले राज्याचे पर्यटन क्षेत्र हे जागतिक पातळीवर पसंतीला उतरत आहे. या क्षेत्रामुळे आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. रोजगाराभिमुख विकासाची या क्षेत्राची क्षमता लक्षात घेऊन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागाच्या पायाभूत सुविधा सोयीसुविधांसाठी दोन हजार ८३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे महायुतीचा यंदाचा अर्थसंकल्प सर्व विभागांना समान न्याय देणार असल्याची प्रतिक्रिया पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.