
सातारा जिल्ह्यात शिवसेनेची खिंड लढवणारे आमदार शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळात स्थान देवून लोकनेत्यांच्या नंतर देसाई घराण्याचा सन्मान केला आहे.
लोकनेत्यांनंतर 42 वर्षांनी देसाईंना कॅबिनेट! पाटण तालुक्यात पेढे वाटून जल्लोष
मोरगिरी - महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नंतर प्रदीर्घ कालावधी नंतर पाटण तालुक्यातील देसाई घराण्यात आमदार शंभुराज देसाई यांच्या रूपाने पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यामुळे या मंत्रिपदाचे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात शिवसेनेची खिंड लढवणारे आमदार शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळात स्थान देवून लोकनेत्यांच्या नंतर देसाई घराण्याचा सन्मान केला आहे. या कॉबिनेट मंत्रीपदामुळे सातारा जिल्ह्याचा शिरपेचात मानाचा तुरा रेवला गेला असल्याचे पाहण्यास मिळाले असून, जबाबदारीच्या खात्याबरोबर पालकमंत्रीपद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यांना कोणते खात मिळणार याबाबत उस्तुकता लागून राहली आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात विविध खात्याची जबाबदारी सांभाळून राज्याला नवी दिशा देण्याचा केला. मात्र, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निधनांनंतर देसाई घराण्यातील मंत्री पदाची परंपरा खंडित झाली ती ४२ वर्षे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच महत्त्वपूर्ण विस्तारात आमदार शंभुराज देसाई यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्याचे स्पष्ट होताच पाटण विधानसभा मतदारसंघात एकच 'जल्लोष' सुरू होऊन उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करून आणि बॅनर उभारून ठिकठिकाणी आपला आनंद साजरा केला. नामदार देसाई हे मुंबईत असतानाच सोमवारी मध्यरात्री पाटण मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत पोहचले होते.
शिंदे-फडणवीस सरकारने अखेर मंत्रीमंडळ विस्तार करीत 18 मंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी कॉबिनेट मंत्रीपदाची मंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री राहलेल्या शंभूराज देसाई यांना कॉबिनेट मंत्रीपद मिळाल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. आमदार देसाई यांची आमदारकीची तिसरी टर्म् असून यांच्या मंत्रीपदामुळे सातारा जिल्ह्याचा शिरपेचात मानाचा तुरा रेवला गेला असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. जबाबदारीच्या खात्याबरोबर पालकमंत्रीपद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यांना कोणते खाते मिळणार याबाबात उस्तुकता लागून राहली आहे.