Satara News : मंत्री शंभूराजे देसाईंचे खासदार संजय राऊत यांना थेट आव्हान

एखाद्या जिल्हा परिषद गटातून तरी निवडून येऊन दाखवा
shambhuraj desai challenge shiv sena mp sanjay raut election program vote
shambhuraj desai challenge shiv sena mp sanjay raut election program voteSAkal

कराड : उद्धव ठाकरे कधी नव्हे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले आहेत. त्यांना अपेक्षित एवढा प्रतिसाद मिळत नाही. लोक त्यांच्याबरोबर येत नाहीत. लोकांनी त्यांचे विचार स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आहे. जेव्हा शिवसैनिक एकत्र होते त्यावेळी मिळणारा प्रतिसाद आणि सध्या मिळणारा प्रतिसाद यामध्ये तफावत आहे.

संजय राऊत यांच्यासारखे विश्वज्ञानी काही माणसं त्यांच्याबरोबर आहेत. संजय राऊत दहा पंधरा लाख मतदारांच्यातून निवडून आलेल्या खासदारावर टीका करतात. राऊत यांनी एखाद्या जिल्हा परिषद मतदार संघातून तरी निवडून येऊन दाखवावे असे थेट आव्हान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना दिले.

मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज महाराष्ट्र दिनी कराड (जि. सातारा) येथे माध्यमांची संवाद साधला ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तेरा खासदार सध्या आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर कधी नव्हे एवढे फिरायला लागले आहेत.

त्यांना अपेक्षित एवढा प्रतिसाद मिळत नाही. लोक त्यांच्याबरोबर येत नाहीत. लोकांनी त्यांचे विचार स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आहे. जेव्हा शिवसैनिक एकत्र होते त्यावेळी मिळणारा प्रतिसाद आणि सध्या मिळणारा प्रतिसाद यामध्ये तफावत आहे.

संजय राऊत यांच्यासारखे विश्वज्ञानी काही माणसं त्यांच्याबरोबर आहेत. संजय राऊत दहा पंधरा लाख मतदारांच्यातून निवडून आलेल्या खासदारावर टीका करतात. राऊत यांनी एखाद्या जिल्हा परिषद मतदार संघातून तरी निवडून येऊन दाखवावे. स्वतः कधी निवडून यायचे नाही स्वतः कधी लोकांच्या जायचे नाही आणि जे 15 लाख लोकातून निवडून येतात त्यांच्यावर टीका करायची हा त्यांचा उद्योग सुरू आहे.

संजय राऊत अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संदर्भात औरंगजेबाच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर सुरू आहेत असे म्हटले आहे त्यावर मंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत यांना माध्यमानी महत्व देण्याचे कारण नाही.

देशाला उंच शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेऊन ठेवले आहे हे देशातील जनतेने स्वीकारलेले आहे. ज्या नेतृत्वाला देशाने डोक्यावर घेतले आहे ते एका बाजूला आहेत आणि संजय राऊत सारखी माणसे एका बाजूला आहेत. त्यांना निवडणुकीच्या मतदानातूनच उत्तर मिळेल.

सीमावर्तींच्या पाठीशी महाराष्ट्र शासन

सीमावरती भागातील 850 गावातील भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील व मी स्वतः काम करत आहे असे सांगून पालकमंत्री शंभूराजे म्हणाले, सीमावरती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आजही महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिक गावांना न्याय मिळाला पाहिजे, ती गावे महाराष्ट्रातच राहिली पाहिजेत यावर राज्य शासन ठाम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com