वीज बीलांची थकबाकी हे भाजपचेच कर्तृत्व : शंभूराज देसाई

वीज बीलांची थकबाकी हे भाजपचेच कर्तृत्व : शंभूराज देसाई

सातारा : राज्यात भाजपच्या काळातच वीज बिलांची थकबाकी माेठ्या प्रमाणात झाली हाेती. त्यामुळे त्यांचा आंदाेलनाचा फार्स असल्याची टिप्पणी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांच्या बैठकीनंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी आमदार सदाशिव सपकाळ, युवा सेनेचे रणजित भाेसले, धैर्यशील कदम, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, राजाभाऊ शेलार आदी उपस्थित हाेते.

सध्या राज्यात भाजप वीज बिलांच्या विषयावर आंदाेलनाचा फार्स करत आहे. विशेष म्हणजे वीज बिलांची सर्वांत जादा थकबाकी भाजपच्या काळातच असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्याची सरकारकडून चाैकशी हाेईलच. भाजप हा विराेधी पक्ष असून सरकारच्या कामकाजावर टीका करणे हेच त्यांचे काम आहे. परंतु टीका टिप्पणी करताना वैचारिक पातळीवर असायला पाहिजे असेही देसाई यांनी नमूद केले.
डॉ. आ. ह. साळूंखेंनी घेतली पहिल्यांदाच राजकीय भूमिका 
 
ते म्हणाले, वीज बीलांच्याबाबतीत भाजपची भुमिका अत्यंत चुकीची आहे. महाविकास आघाडी सरकार सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन शेतक-यांना वीज बिले कमी कशी करता येतील त्यावर विचार करीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे पुणे पदवीधर व शिक्षक मतदासंघात महाविकास आघाडीच्या उमेदावरांच्या विजयासाठी शिवसेना अथक प्रयत्न करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि पक्षाला कमीपणा येईल असे काम काेणताही शिवसैनिक करणार नाही असेही देसाईंनी नमूद केले.

पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com