esakal | शिवसेनेशी बांधील राहिल्यानेच मला मंत्रिपद मिळाले : शंभूराज देसाई I ShivSena
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

पाटण तालुक्याची ओळख लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच महाराष्ट्रात झाली.

शिवसेनेशी बांधील राहिल्यानेच मला मंत्रिपद मिळाले : शंभूराज देसाई

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ : पाटण तालुक्याची ओळख लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यामुळेच महाराष्ट्रात झाली. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) लोकनेत्यांचे राजकीय वारसदार म्हणून व शिवसेना पक्षाचा बांधील राहूनच प्रामाणिक काम केल्याने योगायोगाने तेच मंत्रिपद मिळाल्याने तालुक्याच्या विकासासाठी चांगली संधी मिळाली, असे उद्‌गार मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी काढले.

नावडी नवीन वसाहतीत वेताळवाडी ते नावडी रस्ता डांबरीकरण भूमिपूजन, बौध्द वस्तीत अभ्यासिका इमारतीचे उद्‌घाटन या कार्यक्रमात ते बोलत होते. रविराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर उपस्थित होते. कोरोना संसर्ग महामारीने सर्व उद्योग धंदे बंद पडले. लोकांच्या नोकरीवर गदा आली. पण, शेती क्षेत्र टिकून राहिले. मतदारसंघात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कारखान्याचे संचालक पांडुरंग नलवडे यांनी प्रास्ताविक केले. नावडीसह अडूळ, नाडे, मल्हारपेठ, आबदारवाडी, गिरेवाडी, ठोमसे, सोनाईचीवाडी, विहे परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: काँग्रेसमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही; केरळात बड्या नेत्याचा राजीनामा

loading image
go to top