सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून नवी नियमावली जाहीर; 31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू

उमेश बांबरे
Friday, 2 October 2020

विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत विवाह व मेळावे, समारंभास परवानगी (तहसीलदारांची परवानगी बंधनकारक) व अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी राहील.

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या सुधारित सूचनांच्या आधारे जिल्ह्यात 31 ऑक्‍टोबरपर्यंत नवी नियमावली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केली. त्यामध्ये पाच ऑक्‍टोबरपासून उपस्थितीच्या 50 टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्‌, रेस्टॉरंटस्‌, बार सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची वेळ मात्र पूर्वीचीच ठेवण्यात आली आहे.
 
केंद्र व राज्य शासनाने "अनलॉक 5' जाहीर केले. त्यात राज्याने हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे 50 टक्के क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही सवलत कायम ठेवली. अन्य सवलती या पूर्वीच्याच लागू राहणार आहेत. दुकाने उघडण्याची वेळ ही सकाळी नऊ ते सायंकाळी सात ही पूर्वीचीच कायम ठेवण्यात आली आहे. विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत विवाह व मेळावे, समारंभास परवानगी (तहसीलदारांची परवानगी बंधनकारक) व अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी राहील. 

साक्षे.. साक्षे...! शिक्षणासाठी आत्महत्या केलेल्या साक्षीच्या आईचा हंबरडा व्यवस्थेला चपराक 

...हे राहणार बंद

सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, उद्याने, थिएटर, सभागृह, असेंब्ली हॉल, सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर मेळावे, परिषदा, सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे. (धर्मगुरू, पुजारी यांना पूजा करता येईल) 

टेबललॅंडला हिरवा गालिचा अन्‌ फुलांचा साज! 

...हे राहणार सुरू 

हॉटेल, फूड कोर्टस्‌, रेस्टॉरंटस्‌, बार 50 टक्के क्षमतेने (पाच ऑक्‍टोबरपासून), ऑक्‍सिजनची वाहतूक करणारी वाहने, सर्व रेल्वेतून राज्यात प्रवास, सर्व मार्केट, दुकाने, मेडिकल, औषधांची दुकाने (पूर्ण वेळ), ऑनलाइन शिक्षण, वृत्तपत्र छपाई आणि वाटप (घरपोच वितरणासह), केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, सेतू केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे व आधार केंद्रे, इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना.

सिंधुदुर्गात रक्‍तदान एक चळवळ

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Singh Declares Guidelines Of Unlock Five Satara News