धक्के देणाऱ्या उदयनराजेंना ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाचा बसणार धक्का?

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 14 January 2021

त्यानंतर खूद्द उदयनराजेंनीच ग्रेड सेपरेटर जनतेसाठी खूला केल्याची घाेषणा केली. त्यानंतर या ग्रेड सेपरेटरमधून वाहतुक सुरु झाली आहे.

सातारा : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उदघाटन लवकरच केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिली. जिल्हाधिकारी सिंह यांनी काेविड 19 याच्या लसीकरणाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली हाेती. 

त्यावेळी माध्यमांतील प्रतिनिधींनी ग्रेड सेपरेटरमधील त्रुटींबाबत जिल्हाधिकारी सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रेड सेपरेटरचे उदघाटन कधी केले जाणार या प्रश्नावर लवकरच उदघटान केले जाईल. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करुन तारीख ठरवली जाईल.

नेमके काय घडले आज साता-यात. उदयनराजेंच्या काेणत्या कृतीने साता-यात त्यांची रंगली चर्चा 

या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बाेलावणार आहात अशी चर्चा आहे. त्यावर मी याबाबत अधिक बाेलू शकणार नाही असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. दरम्यान आठ जानेवारीस खासदार उदयनराजे भाेसले यांनी ग्रेड सेपरेटरचे उदघाटन केले हाेते. हा कार्यक्रम अशासकीय जरी असला तरी त्यास उदयनराजेंच्या चाहत्यांनी माेठ्या प्रमाणात उपस्थिती लावली हाेती. त्यानंतर खूद्द उदयनराजेंनीच ग्रेड सेपरेटर जनतेसाठी खूला केल्याची घाेषणा केली. त्यानंतर या ग्रेड सेपरेटरमधून वाहतुक सुरु झाली आहे.

साताऱ्याचा नादच खुळा! धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया... प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Singh Decleares Inaguration Of Grade Seprator Of Satara Marathi News