शेंद्रे ते कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ

20 वर्षांपूर्वी एनएचआयशी झालेल्या करारानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल 133 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाची उभारणी केली.

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ

वहागाव - राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) शेंद्रे (Shendre) ते कागल (Kagal) या महामार्गाचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा रस्ते देखभालीचा व टोल वसुलीचा (Toll Recovery) कार्यकाल ता. २ मे संपणार होता, मात्र कोरोना काळात महामार्ग बंद राहिल्याने त्यादरम्यानची रस्ते देखभालीची जबाबदारी व टोल वसुली करण्यासाठी एनएचआयकडून (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून) राज्य रस्ते विकास महामंडळाला 53 दिवसांची म्हणजे 25 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे सध्या तरी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या टोलवसुलीची व रस्ते देखभालीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बांधा, वापरा व हस्तांतर करा या हेतूने 20 वर्षांपूर्वी एनएचआयशी झालेल्या करारानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल 133 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाची उभारणी केली. दरम्यान, आज ता. 2 मेला हा कार्यकाल संपणार होता,मात्र कोरोना काळात संपूर्ण देशात अचानक लाँकडाऊन जाहिर झाल्याने सुमारे 53 दिवस हा महामार्ग बंद होता. त्यावेळी शासननिर्णयानुसार येथील टोलवसुलीही बंद होती. त्यानंतर 53 दिवसानंतर टोलवसुली पूर्ववत सुरु झाली. मात्र, करारानुसार त्या 53 दिवसांची टोलवसुली होणे अपेक्षित होते. मात्र ती झाली नव्हती. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापनाने एनएचआयकडे टोलवसुलीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. नुकताच एनएचआयकडून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या प्रस्तावाला मुदतवाढ मिळाली असून येऊ घातलेल्या 53 दिवसांसाठी म्हणजेच 25 जूनपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या 133 किलोमीटरवरील महामार्गाच्या एनएच-4 च्या रस्ते देखभालीची व टोल वसुलीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहे. त्यामुळे सध्या तरी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या टोलवसुलीची व रस्ते देखभालीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहे. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर आज नेहमीप्रमाणे टोल वसुली सुरु होती.

टोल बंदची अफवाच...

राज्य रस्ते विकास महामंडळाचा रस्ते देखभालीचा व टोल वसुलीचा कार्यकाल आज ता. २ मे संपणार होता, मात्र कोरोना काळात महामार्ग बंद राहिल्याने त्यादरम्यानची रस्ते देखभालीची जबाबदारी व टोल वसुली करण्यासाठी एनएचआयकडून 53 दिवसांची म्हणजे 25 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. टोल बंदबाबत कोणताही शासन आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे, सध्या तरी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या टोलवसुलीची व एनएच-4 च्या रस्ते देखभालीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे असून टोल बंद होणार ही अफवा आहे. सोशल मीडियांवर होणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, संबंधित व्यवस्थापनास टोल वसुलीस सहकार्य करावे.

- वसंत पंढारकर (प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग,कोल्हापूर)

Web Title: Shendre To Kagal Highway Toll Recovery 53 Days Extension

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top