
शिखर शिंगणापूर : येथील वार्षिक चैत्र यात्रेदरम्यान सातारा अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून सुमारे ९५ हजार रुपये किमतीचा ५० किलो अनधिकृत गुटखा पकडला. कैलासनगर चौकातील राजेंद्र गजानन होळ (रा. शिंगणापूर) यांच्या किराणा दुकानात साताऱ्याच्या महिला अधिकारी प्रियांका वाईकर यांनी ही कारवाई केली.