Shirwal scrap warehouse burns down : शिरवळ येथील केदारेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या भंगाराच्या गोडाऊनमधील प्लॅस्टिकसह लाकडी साहित्याने आज दुपारी पेट घेतला. धुराचे लोट दिसू लागल्याने आग लागली असल्याचे लक्षात आले.
"Firefighters battling the massive blaze at a scrap warehouse in Shirwal, which led to the destruction of lakhs worth of materials."Sakal
खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथे भंगार गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. उन्हाच्या तीव्रतेमुळे या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. भंगार गोदामाला आग लागण्याचा हा या महिन्यातील तिसरा प्रकार आहे.