सातारा : ‘शिवभोजन’चा ६० हजारांना घास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv bhojan thali

सातारा : ‘शिवभोजन’चा ६० हजारांना घास

सातारा : कष्टकरी, मजूर व गरजू लोकांना राज्य सरकारची शिवभोजन थाळी आधार ठरत आहे. कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळीचे मोफत वितरित केली होती. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर थाळीची किंमत दहा रुपये करण्यात आली. थाळीची किंमत वाढूनही जिल्ह्यात सध्या २८ केंद्रांच्या माध्यमातून महिन्याला ५९ हजार ७०० थाळींचे वाटप केले जात आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीच्या माध्यमातून भुकेलेल्या गरीब- गरजू लोकांची भूक भागविण्याचे काम होत आहे.

राज्यभरात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गरीब- गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली. शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीला दहा रुपयांत शिवभोजन थाळी दिली जात होती. त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मार्च २०२० नंतर दोन महिने सर्वच केंद्रे बंद होती.

दररोज १,९९० थाळींचा लाभ

जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत दोन लाख ३५ हजार १५९ शिवभोजन थाळींचा नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यामध्ये महिन्याला सुमारे एक हजार ९९० थाळींचे वितरण झाल्याचे आकडेवारीवरून पाहायला मिळते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर थाळीची किंमत दहा रुपये करूनही शिवभोजनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

शिवभोजन थाळींच्या माध्यमातून जिल्ह्यातील केंद्रांवर नागरिकांना चांगल्या प्रतीचे जेवण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी, मजूर व गरजू लोकांना या योजनेचा फायदा होत आहे, तसेच कोरोना काळानंतरही केंद्रावर लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत आहे.

- स्नेहा किसवे-देवकाते, उपजिल्हाधिकारी, सातारा

Web Title: Shiv Bhojan Thali Satara District 29 Center 60 Thousand Thali Allocate To The People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..