
आसू : राज्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू वैष्णवी विठ्ठल फाळके आसू (ता. फलटण) आणि अक्षदा आबासाहेब ढेकळे (वाखरी, ता. फलटण) यांचाही समावेश असून, फलटणच्या या दोन कन्यांनी सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे.