
-सुर्यकांत पवार
कास : महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असले तरी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात उपमुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा कोंडमारा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आयोजित केलेल्या मेढा (ता. जावळी) येथील शिवसैनिकांच्या बैठकीत भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करण्यात आली.