
'शिवसेना सामान्य जनतेचा पक्ष आहे, त्यासाठी पक्षाची संघटन बांधणी मजबूत करा.'
शिवसेना शेवटच्या घटकापर्यंत पोचवा; दिवाकर रावतेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
कऱ्हाड (सातारा) : शिवसेना (Shiv Sena) सामान्य जनतेचा पक्ष आहे. तो वाढविण्यासाठी सामान्यातील सामान्य घटकापर्यंत पदाधिकारी पोचला पाहिजे. त्यासाठीची पक्षाची संघटन बांधणी मजबूत करा, अशा सूचना शिवसनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते (Divakar Ravate) यांनी येथे केली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकांच्या (Zilla Parishad Election) तयारीचा आढावा श्री. रावते यांनी घेतला. त्यावेळी तो बोलत होते. या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत शेलार, जिल्हा संघटीका अनिता जाधव उपस्थित होते. श्री. रावते यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय पदाधिकांऱ्यांशी संवाद साधून त्याची माहिती घेतली. या वेळी राज्यमंत्री देसाई यांनी शासनाने केलेल्या कामाची माहिती दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अडीच वर्षात घेतलेल्या विविध निर्णयाचा आढावाही देसाई यांनी घेतला.
हेही वाचा: राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर..; संजय ठाकुरांचा थेट इशारा
कोविडच्या (Coronavirus) कठीण काळातसुध्दा महाराष्ट्राने विविध क्षेत्रात प्रगती केल्याचे त्यांनी नमूद केले. श्री. बानगुडे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संघटना पातळीवरील अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी कऱ्हाड व पाटण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, तालुकाप्रमुख नितीन काशीद, सनीश पाटील, राहल कुंभार, उपजिल्हा संघटिका कविता यादव, उपतालुकाप्रमुख दिलीप यादव, काकासाहेब जाधव, संजय चव्हाण, माणिक आन्नारकर, उत्तम जाधव, सुनिल पाटील, शंकर वीर, शहरप्रमुख शशिराज करपे, मधुकर शेलार, उपशहरप्रमुख शेखर बर्गे, अक्षय गवळी यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
Web Title: Shiv Sena Is The Party Of Common People Divakar Ravate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..