शिवाजी भिलारे झाले 'पुस्तकांच गाव'चे कारभारी

शिवाजी भिलारे झाले 'पुस्तकांच गाव'चे कारभारी

भिलार (जि. सातारा) : पुस्तकांच गाव भिलारच्या सरपंचपदी जन्नीमाता विकास पॅनेलचे शिवाजी भिलारे यांची, तर उपसरपंचपदी सुनीता शशिकांत भिलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांची गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.
 
अर्ज भरण्याच्या मुदतीत सरपंच व उपसरपंचपदासाठी एक एकच अर्ज दाखल झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश गार्डे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण, तलाठी शशिकांत वणवे यांनी मदत केली.
 
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नवनिर्वाचित सदस्य वंदना भिलारे, वैशाली कांबळे, संदीप पवार, अनिल भिलारे, मंगल भिलारे, वैभव भिलारे, सारिका पवार उपस्थित होते. सरपंच शिवाजी भिलारे व उपसरपंच सुनीता भिलारे यांचे आमदार मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी सभापती रूपालीताई राजपुरे, पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई कदम, उपसभापती संजूबाबा गायकवाड, आनंदा उत्तेकर, जिल्हा परिषद सदस्या नीता आखाडे, मनीषा जंगम, जन्नीमाता पॅनेलचे प्रमुख आनंदा भिलारे, प्रवीण भिलारे, माजी सरपंच राजेंद्र भिलारे, शशिकांत भिलारे आदींनी अभिनंदन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com