शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत सापडले

शिवथर येथे एका घरासमोर हे नवजात पुरुष अर्भक मृत आढळले.
Shivthar
ShivtharSakal
Summary

शिवथर येथे एका घरासमोर हे नवजात पुरुष अर्भक मृत आढळले.

शिवथर - शिवथर येथे एका घरासमोर हे नवजात पुरुष अर्भक मृत आढळले. खरेतर जन्मास येण्याचा त्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या त्याच्या आई-बापांनी सामाजिक भान ठेवले नाही. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी आणि गावोगावी अनौरस व अनाथ अर्भकांच्या प्रश्न वेळोवेळी उद्भवतो मात्र सामाजिक शिक्षण हेच यावरचे उत्तर आहे. भर वस्तीत एका घराच्या दरवाज्याजवळ मृत अर्भक आढळले सदरची घटना गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनला समजल्यावर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

शिवथर येथील भैरवनाथ मंदिरानजिक श्रीनिवास संपत साबळे हे सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यावर दरवाजा उघडण्यासाठी आले असता दरवाजा बाहेरून बंद अवस्थेमध्ये आढळून आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना काहीतरी गहाण कोणीतरी आणून टाकल्यासारखे वाटले. त्यांनी पाठीमागून घराच्या समोर आल्यावर मृत अर्भक दिसून आले. त्यांनी तातडीने पोलीस पाटील यांना खबर दिली. घटनास्थळावर सातारा तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी पीएसी दळवी व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिवथर येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंदाजे नऊ महिन्याचे मुलाचे अर्भक मृतावस्थेत मध्ये दिसून आले.

सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने पोलिसांनी श्वानपथक मागवले व घटना घडली. त्या ठिकाणी काही पुरावे सापडतात का, याची तपासणी केली मृत अर्भक कोणी? आणि का त्यांच्या घराजवळ टाकले. त्याचा तपास केला असता, सध्या तरी काही आढळून आले नाही. सदरची घटना अतिशय निंदनीय असल्याने पोलिस यंत्रणेला आणि पंचक्रोशीत काम करणाऱ्या आरोग यंत्रणेला आव्हान ठरणार आहे.

सदर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पीएसआय ज्ञानेश्वर दळवी, बीट अंमलदार प्रफुल्ल डोंबाळे, हेड कॉन्स्टेबल आर. व्ही. घोरपडे अधिक तपास करत आहेत.

शिवथर (ता. सातारा) येथे नुकतेच एक पुरुष नवजात अर्भक आढळले. मात्र त्यानिमित्ताने या प्रश्नाचे गांभीर्य सामाजिकदृष्ट्या समजून घेणेही गरजेचे आहे. कदाचित हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मास आले असावे, मात्र त्याचा पंचनामा करताना पोलीस अधिकारी चौधरी व दळवी आणि कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना व समाजातील अन्य जागृत घटकांना दिलेली दमहीन वागणूक याकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देणार असल्याचे विविध दैनिकांच्या पत्रकारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com