
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये शस्त्रक्रिया, बाळंतपणातील गुंतागुंत, डेंगी, ॲनिमिया आणि इतर वैद्यकीय परिस्थितींमुळे रक्ताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अक्षय ब्लड बँकतर्फे फिरते रक्तदान केंद्र म्हणजेच (मोबाईल ब्लड डोनेशन व्हॅनची) संकल्पना राजापुरी गावातील उद्योजक सतीश साळुंखे यांनी जिल्हावासीयांसाठी घेऊन येत आहेत. ही संकल्पना आदर्शवत असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ब्लड व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.