
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे सरदार, शिलेदार यांचा आपल्याला माहीत नसलेला इतिहास समाजापुढे आला पाहिजे. खरा इतिहास प्रत्येकाला समजला पाहिजे, या उद्देशाने आपण एक दिवसाचे शिवसाहित्य संमेलन साताऱ्यात भरवले. केवळ आजच नव्हे, तर छत्रपतींच्या इतिहासाला सातत्याने उजाळा मिळण्यासाठी शिवसाहित्य संमेलन दर वर्षी घेतले जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. समारोपप्रसंगी गोष्ट इथे संपत नाही, याचे सादरीकरण झाले.