

Shivneri Sugars Announces Rs 3900 First Sugarcane Payment
esakal
कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी जयपूर (ता. कोरेगाव) येथील शिवनेरी शुगर्सने ३९०० रुपये दर जाहीर करुन आज फोडली. शेतकरी संघटनांच्या रेट्यांमुळे जाहीर झालेल्या ऊसदराने आंदोलनाला यश आले आहे. शिवनेरी शुगर्सनंतर आता जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या ऊसदराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा व अन्य संघटनांनी खर्डा-भाकरी खावुन आंदोलन केले तर कऱ्हाडला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ऊसदर पत्रकाची होळी करुन निषेध नोंदवला. सह्याद्री, जयवंत शुगर्स कारखाना परिसरातील इंदोली फाटा, खराडे फाटा येथेही आंदोलन करण्यात आले. शिवनेरी शुगर्सच्या निर्णयाने पाच दिवस आंदोलन स्थगीत करण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केले आहे.