esakal | 'नारायण राणे मुर्दाबाद..'; कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी नारायण राणे यांनी चुकीचे वक्तव्य करुन व्देष निर्माण करण्याचे काम केले आहे.

'नारायण राणे मुर्दाबाद..'; कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : मुर्दाबाद, मुर्दाबाद, नारायण राणे मुर्दाबाद, नारायण राणेंचा धिक्कार असो, शिवसेना जिंदाबाद... अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Minister Narayan Rane) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी त्यांच्या फोटोस जोडेमारो आंदोलन करुन तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी तहसीलदार अमरदीप वाकडे (Tehsildar Amardeep Wakde) यांच्याकडे निवेदनाव्दारे केली, तर साताऱ्यात शिवसैनिकांकडून (ShivSena) राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याचा आरोप करुन शिवसेनेच्या वतीने आज कऱ्हाड (जि. सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, साजीद मुजावर, राजेंद्र माने, मधुकर शेलार, अतुल वैद्य नितीन देसाई, सुनिल शिंदे, सुभाष पाटील, शरद कुंभार, संदीप पवार, दत्ता पवार, अविराज देशमुख, सुनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: कायद्याप्रमाणेच कारवाई होईल, राणेंच्या अटकेवर गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

जिल्हा प्रमुख शेलार म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी नारायण राणे यांनी चुकीचे वक्तव्य करुन व्देष निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याचा सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. राणे यांचे वक्तव्य मराठी माणसाला चीड आणणारे आहे. गेली दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामाचा हेवा वाटत आहे. त्यांचे काम देशात आदर्शवत असताना अशा सूर्यरुपी माणसांवर थुंकण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शशिकांत हापसे यांनी नारायण राणे हे कुणामुळे मोठं झालो हे महाराष्ट्राला माहिती आहे, मात्र अशी वक्तव्य शिवसैनिक आता कदापि सहन करणार नाहीत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

loading image
go to top