वीजबिलात 50 टक्के माफी द्या : शिवसेनेची कऱ्हाडात मागणी

वीजबिलात 50 टक्के माफी द्या : शिवसेनेची कऱ्हाडात मागणी
Updated on

कऱ्हाड ः कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन एकूण वीजबिलात 50 टक्के माफी द्यावी, वीजबिल भरण्यास हप्ते बांधून द्यावेत, यांसह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेतर्फे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कोरोनामुळे कोंबडे शोधण्याची वेळ! गावोगावी चित्र 
 
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, कऱ्हाड तालुकाध्यक्ष नितीन काशीद, शशिकांत हापसे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र माने आदींनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. वीज कंपनीने लॉकडाउनच्या काळात दिलेल्या बिलातील त्रुटी त्वरित दूर करत दुरुस्ती करावी, इतर आकारलेले सेवा आकार रद्द करावेत, स्थिर आकार रद्द करून ग्राहकांना दिलासा द्यावा, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एकूण वीजबिल 50 टक्के माफ करावे, वीजबिल भरण्यासाठी हप्ते बांधून द्यावेत, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या पक्षाची जनता कर्फ्यूची मागणी

वीज कंपनीच्या अवास्तव व अन्यायकारक बिलांमुळे सामान्यांत प्रचंड असंतोष आहे. लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या काळात सामान्यांचे उद्योग, व्यवसाय, रोजगार, नोकऱ्या आदींवर विपरित परिणाम झाला आहे. सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याने रोजच्या गरजा पूर्ण कशा करायच्या, असा प्रयत्न त्यांच्यापुढे आहे. वाढीव बिलांची बाब अन्यायकारक आहे. वीजबिल न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही ग्राहकांची वीज जोडणी तोडली जावू नये, सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा अन्यायकारक बाबीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

Video : काेयना, महाबळेश्वरातील पाऊस ओसरला; घाटातील धबधबे वाहू लागले

शेतकऱ्यांसाठी उदयनराजे समर्थकांचा 'या' गाेष्टीला विरोध 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com