esakal | सातारकरांनाे! लस घेण्यासाठी सिव्हीलला निघालात? थांबा, हे वाचा

बोलून बातमी शोधा

सातारकरांनाे! लस घेण्यासाठी सिव्हीलला निघालात? थांबा, हे वाचा

जिल्हा प्रशासनाने तातडीने काेवॅसिनची लस उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील डाॅ. कुलकर्णी यांनी ई-सकाळशी बाेलताना केली.

सातारकरांनाे! लस घेण्यासाठी सिव्हीलला निघालात? थांबा, हे वाचा
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणास सातारा शहरात रविवारपासून जाेमाने प्रारंभ झाला आहे. येथील कस्तुरबा रुग्णालय, गाेडाेली प्राथमिक आराेग्य केंद्र तसेच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय (सिव्हील) येथे नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. 

दरम्यान सातारा शहरातील क्रांतिसिंह जिल्हा रुग्णालयात लसीकरण माेहिमेस पुन्हा एकदा प्रारंभ झाला असला तरी येथे काेविशिल्ड लस उपलब्ध असून काेवॅसिन लसीचा तुटवडा आहे. यामुळे आज (मंगळवार) या रुग्णालयात लसीकरणासाठी गेलेल्यांची निराशा झाली. याबाबत लसीकरणासाठी गेलेले डाॅ. कुलकर्णी म्हणाले मी काेव्ॅसिनची लस घेतली हाेती. लसीकरणास पुन्हा प्रारंभ झाल्याने दूसरा डाेस घेण्यासाठी आलाे. 

जिल्हाधिकारी साहेब! बगाड यात्रेतील धाेका टाळण्यासाठी बावधनसह वाड्यावस्त्यांवरील प्रत्येकाची काेराेनाची चाचणी करा 

येथे आल्यानंतर मला काेविशिल्ड लस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काेव्ॅसिनची लस कधी मिळेल असे विचारले असता संबंधित आराेग्य कर्मचा-यांना याेग्य माहिती देता आली नाही. माझ्याप्रमाणे अन्य काही लाेकांना देखील काेवॅसिनची लस उपलब्ध नसल्याने पुन्हा माघारी जावे लागले. जिल्हा प्रशासनाने तातडीने काेवॅसिनची लस उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील डाॅ. कुलकर्णी यांनी ई-सकाळशी बाेलताना केली. दरम्यान याची माहिती घेण्यासाठी सकाळी दहा वाजता जिल्हा रुग्णालयात  दूरध्वनी केला परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही.

काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत 

गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन