esakal | क-हाड : लसीचा साठा संपला; तीन केंद्र झाली बंद
sakal

बोलून बातमी शोधा

क-हाड : लसीचा साठा संपला; तीन केंद्र झाली बंद

याबराेबरच शहरातील 45 वर्षांवरील सगळ्यांचेच लसीकरणासाठी तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात आली. 

क-हाड : लसीचा साठा संपला; तीन केंद्र झाली बंद

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपला आहे. त्यामुऴे चारपैकी तीन लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आराेग्य विभागावर आली आहे. बुधवारी दिवसभरात 70 लस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर लस शिल्लक नसल्याने तीन केंद्र बंद ठेवावी लागली आहे. उद्यापर्यंत (शुक्रवार) लस पुरवठा सुरळीत होईल, असे आरोग्य विभागातील आर. डी. भालदार यांनी सांगितले. 

येथील नागरी आरोग्य केंद्रात नुकताच कोविड लसीकरणास प्रारंभ झाला आहे. लसीकरणासाठी सात आरोग्यसेविका तसेच नर्स स्टाफ, फार्मासिस्ट, दोन डेटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी पालिकेतर्फे मंडप घालण्यात आला आहे. त्यासाठी अंगणवाडीची जागा आहे. तेथे वेटिंगरूम, निरीक्षण कक्ष तयार केला आहे. याबराेबरच शहरातील 45 वर्षांवरील सगळ्यांचेच लसीकरणासाठी तीन लसीकरण केंद्रे उभारण्यात आली. 

दरम्यान लसीचा पूरवठा संपल्याने शहरातील तीन लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत.  नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण सूरू आहे. या केंद्रावर लसीचा पुरवठाही अल्प आहे. तो फक्त आज पूरेल एवढाच आहे. लसीचा साठा उपलब्ध झाल्यानतंर सर्व केंद्रावर लसीकरण सूरू होईल असेही भालदार यांनी स्पष्ट केले.

चिंताजनक! साताऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, या रुग्णालयांत शिल्लक आहेत बेड, व्हेंटिलेटर, ICU; जाणून घ्या नेमकी स्थिती.. 

Video पाहा : बेड, रेमडिसिव्हर, औषधांचा तुटवडा भासणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावास राष्ट्रवादीतूनच विरोध; शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष 

Edited By : Siddharth Latkar

loading image