सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर

प्रशांत घाडगे
Thursday, 8 April 2021

जिल्ह्यात आजअखेर दोन लाख 72 हजार 17 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यातील लशीचा पहिला डोस 2 लाख 22 हजार 796 नागरिकांनी घेतला असून, दुसरा डोस 33 हजार 638 नागरिकांनी घेतला आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात लशीचा तुटवडा पडल्याने तब्बल दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

सातारा  : गेल्या आठवड्यापासून धुमधडाक्‍यात सुरू झालेली लसीकरणाची मोहीम जिल्ह्यातील लशीचा साठा संपल्याने बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. लस उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण होऊ शकणार नाही, असे प्रशासनाने आज जाहीर केले. जिल्ह्यात एक मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात संरक्षण दल, सरकारी कर्मचारी, तर तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सर्वाधिक नागरिकांची गर्दी झाली असून, जिल्ह्यातील 72 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 326 उपकेंद्रांवर लसीकरण केले जात आहे.
 
जिल्ह्यासाठी तीन दिवसांपूर्वी लशीचे 60 हजार डोस उपलब्ध झाले होते. प्रशासनाने दररोज 20 हजारांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला होता. मात्र, आता लशीचा साठाच संपला असल्याने या मोहिमेला काहीशी खीळ बसली आहे. 

सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

Video पाहा : सातारा जिल्ह्यात लस कमी पडू देणार नाही : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम

दुसरा डोस लांबणीवर? 

जिल्ह्यात आजअखेर दोन लाख 72 हजार 17 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यातील लशीचा पहिला डोस 2 लाख 22 हजार 796 नागरिकांनी घेतला असून, दुसरा डोस 33 हजार 638 नागरिकांनी घेतला आहे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात लशीचा तुटवडा पडल्याने तब्बल दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

लशीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील लसीकरण बंद करण्यात आले आहे. राज्य शासनाकडे लशीची मागणी केली असून, लस उपलब्ध झाल्यानंतर पुढील सत्रास सुरुवात केली जाणार आहे.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

मायबाप सरकार...पोटावर मारू नका! व्यापाऱ्यांची विनवणी; नियम पाळू व्यवसायाला परवानगी द्या

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

बातमी कामाची! घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवाल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage Of Covid 19 Vaccine In Satara Breaking News