घरकुलाची बांधकाम रखडली; वाळू उपसा बंदी उठविण्याची गरज

घरकुलाची बांधकाम रखडली; वाळू उपसा बंदी उठविण्याची गरज
Updated on

कुकुडवाड (जि. सातारा) : कोरोनाच्या लॉकडाउननंतर माण तालुक्‍यात शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरकुलांची सोडत निघाल्यामुळे गावोगावी लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. यात घरकुल पूर्ण करण्यासाठी यंदा अवधी पण कमी मिळणार आहे. लॉकडाउननंतर सिमेंट, लोखंडपत्रा आणि मजुरीचे दर जणू गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांचा पायात लोखंडाच्या महागाईची बेडी अडकली, असे म्हणावे लागत आहे.
 
तालुक्‍यातील अनेक बेघरांना शासनाच्या आर्थिक आणि जातीनिहाय झालेल्या गणनेतून घरकुल मंजूर झालेली आहेत. तसे पाहता हा सर्व्हे सण 2011 मध्ये करण्यात आलेला होता. पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्यांना एकूण विविध टप्प्यांत एक लाख 50 हजार अनुदान मिळते. त्यात प्रामुख्याने स्वच्छतागृह बांधणीसाठी 12 हजार आणि उरलेली रक्कम घरासाठी असे नियोजन असते. आता घरकुल पूर्ण करण्याचा अवधी जवळ येत चालला असल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. तालुक्‍यात वाळू बंद असल्यामुळे अनेक घरकुले रखडली आहेत. 

चोरटी वाळू मिळते ती पण चढ्या दाराने मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नसल्याने घर मिळाले; पण बांधायचे कसे? हा प्रश्न पडलेला आहे. यातच सिमेंट व लोखंडाचे दरही 20 ते 25 टक्‍क्‍याने वाढले असल्याने बांधकाम व्यवसायास पुन्हा मरगळ येणार असे दिसत आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडलेले असतानाच घरासाठी शासन पैसे देणार असले, तरी सुरवातीस आपल्या जवळील पैसे घालावे लागणार असल्याने अनेकांनी यातून माघार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पुढील वर्षीची आगाऊ उचल! 

ग्रामीण भागातील अनेकांनी घरकुल बांधण्यासाठी ऊसतोड मुकादमांचे पाय धरले आहेत. पुढील वर्षीची आगाऊ उचल आताच घेण्यास सुरुवात केलेली आहे. शासनाकडून नवीन दरानुसार अंदाजपत्रक तयार करावे, घरकुल रक्कम वाढवून मिळावी, अशी कुजबूज घरकुल लाभार्थ्यांमधून कानी पडत आहे.

कोयना पुलावरून आठवडाभरात चारचाकी वाहतूक; माजी मुख्यमंत्र्यांची माहिती

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com