Sakal-Shravansari Eventsakal
सातारा
Shravansari Event : ‘सकाळ’तर्फे साताऱ्यात मंगळवारी खास महिलांसाठी ‘श्रावणसरी’
दैनिक ‘सकाळ’च्या वतीने खास महिलांसाठी ‘श्रावणसरी’ हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
सातारा - दैनिक ‘सकाळ’च्या वतीने खास महिलांसाठी ‘श्रावणसरी’ हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. श्रावणसरींनी हिरव्यागार झालेल्या डोंगरकुशीत वसलेल्या साताऱ्यात मंगळवारी (ता. २७) दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत येथील शाहू कलामंदिरात महिलांना हा जल्लोष करता येणार आहे.