
या महोत्सवातील गुलालाचा मुख्य कार्यक्रम आठ जानेवारीला पहाटे होणार आहे. त्यापूर्वी पौर्णिमेदिवशी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे; परंतु अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाबाबत प्रशासनाची कोणतीच हालचाल दिसत नसल्याने सर्व जण संभ्रमावस्थेत आहेत.
गोंदवले (जि. सातारा) : यंदा श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी भाविकांनी घरीच साजरी करण्याचे आवाहन समाधी मंदिर समितीने केले असले, तरी गोंदवल्यात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांवर आलेल्या या यात्रेबाबत मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतेच संकेत मिळाले नसल्याने भाविक, व्यापारी व ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. "श्रीं'चा पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून (ता. 31) सुरू होत असून, आठ जानेवारीला सांगता होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी शासनाने बंधने घातली आहेत. सध्या यात्रांचा हंगाम सुरू झाला असून, लोकांची गर्दी होऊ नये म्हणून केवळ पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीतच विधी करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात गुरुवारपासून पुण्यतिथी महोत्सव सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर समाधी मंदिर समितीने सर्व उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा सेवेकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नित्य उपासना होणार आहे. दर वर्षीप्रमाणे महोत्सव काळात मान्यवरांच्या प्रवचन व गायनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याशिवाय भाविकांसाठी निवास, भोजन व वैद्यकीय सेवाही बंद राहणार आहे. समाधी दर्शनासाठीही नियोजित वेळेतच मंदिर खुले राहणार आहे. भाविकांनी घरीच हा महोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
एका नोटीसला इतके घाबरले, मग संजय राऊतांना म्हणत बसावं लागेल मै नंगा हू.
मंदिर समितीने या उपाययोजना केल्या असल्या, तरी समाधी दर्शनाच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अद्याप कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. महोत्सव काळात यात्रा भरणार की नाही याबाबतही संभ्रम आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दर्शनासाठी भाविकांना येऊ दिले जाणार की नाही हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडूनही चिंता व्यक्त होत आहे. महोत्सवातील गुलालाचा मुख्य कार्यक्रम आठ जानेवारीला पहाटे होणार आहे. त्यापूर्वी पौर्णिमेदिवशी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे; परंतु अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाबाबत प्रशासनाची कोणतीच हालचाल दिसत नसल्याने सर्व जण संभ्रमावस्थेत आहेत.
उदयनराजे सर्मथक बाळासाहेबांच्या नगरसेवकपदाच्या अर्जास आव्हान
Edited By : Siddharth Latkar