महाराणी ताराराणी यांचे निधन इसवी सन १७६१ मध्ये साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर (Ajinkyatara Fort) झाले. त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली होती.
सातारा : मंदिर वज्रलेपासाठी प्रसिद्ध असलेल्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानने माहुली येथील महाराणी ताराराणी (Maharani Tararani) यांच्या समाधीला वज्रलेप प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रक्रियेमुळे या समाधीच्या चिरांचे आयुष्य ५० वर्षांनी वाढले आहे. प्रतिष्ठानने महाराणी ताराराणी यांच्या समाधीची महाआरती आणि विशेष पूजा केली.