Women's Day : बहिणीच्या मुलाला जमीन,घरही!

गोंदीच्या विजया पवार यांचे अनोखे दातृत्व
Women's Day
Women's Day sakal
Updated on

रेठरे बुद्रुक: बहिणीच्या पोराला पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. लग्न लावून संसारही थाटून दिला. सुनेला नोकरीही लावली. इतकंच नव्हे, तर आपल्या वाट्याला येणारी जमीन अन् घरही दिले. आजच्या कलीयुगात बहिणीच्या मुलाची प्रेमाची भूक भागवणारी अन्‌ मायेची ऊब देणारी, माय मरो पण मावशी उरो ही म्हण गोंदीच्या विजया पवार या माऊलीने वास्तवात उतरवली आहे.

गोंदी येथील (कै.) लक्ष्मण पवार व माजी सरपंच, पंचायत समितीच्या माजी सदस्या विजया पवार या दांपत्यास नितीन, किशोर व प्रवीण ही तीन मुले. विजया यांच्या बहीण अरुणा जाधव या उच्चशिक्षित होत्या. त्यांचा विवेक हा मुलगा सव्वा वर्षाचा असताना त्यांनी विजया यांना सांभाळण्यासाठी दिला. त्यानंतर काही दिवसांतच अरुणा यांचे अकाली निधन झाले. बहिणीने दिलेले वचन पाळत त्या पोरक्या मुलाला त्यांनी पोटच्या तीन मुलांबरोबर जीव लावून सांभाळले. त्याचे बालहट्ट पूर्ण करतच त्याला उच्च शिक्षण देऊन नोकरीही लावली. त्याचबरोबर त्याचा संसारही थाटून दिला. त्याची पत्नी प्रमोती या शिक्षित आहेत. विजया पवार यांनी त्यांना नोकरीसही लावले. या तिघांनी विवेक हा आपला भाऊ समजून त्याला प्रेम दिले. आई-वडिलांच्या मायेने पोरक्या झालेल्या पोराला मावशीने तेवढ्याच जिव्हाळ्याने सांभाळले. मावशीने त्याला स्वतःचे घर आणि दोन एकर जमीनही दिली आहे. काही महिन्यांपूर्वी विवेक यांचे निधन झाले. आजकालच्या स्वार्थी दुनियेत कोण कोणाला इंचभर जमीन देत नाही. विजया पवार यांचा आदर्श प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

माझ्याकडून माझ्या बहिणीने वचन घेतले होते. त्याला जागून मी माझ्या मुलाप्रमाणेच विवेकचा सांभाळ केला. त्याची सर्व कर्तव्ये पूर्ण केली. हे बघायला विवेक आज हयात नाही. काही महिन्यांपूर्वी त्याचे दुर्दैवी निधन झाले. आता त्याची पत्नी, मुलगा तितक्याच जिव्हाळ्याने आम्ही सांभाळत आहोत.

- विजया पवार, गोंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com