esakal | 'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी इच्छुकांना उद्या भरता येणार नाही अर्ज; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Factory

शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी पहिल्याच दिवशी सहा जणांनी अर्ज दाखल केले.

'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी इच्छुकांना उद्या भरता येणार नाही अर्ज; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी (Yashwantrao Mohite Krishna Cooperative Sugar Factory) पहिल्याच दिवशी सहा जणांनी अर्ज दाखल केले. 127 अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान, सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक मनोहर माळी (Manohar Mali) यांनी दिली. त्यात डॉ. सुरेश भोसले (Dr. Suresh Bhosale) यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे विद्यामान संचालक धोंडीराम जाधव यांच्यासह अन्य सहा उमेदवारांचे अर्ज आहेत. (Six Candidates Filed Their Nomination On The First Day For Krishna Factory Election)

कृष्णा कारखान्याचे कऱ्हाड तालुक्यासह वाळवा, शिराळ, कडेगाव व पलूस तालुक्यांचा कार्यक्षेत्र आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा (Election) कार्यक्रम काल जाहीर झाला आहे. 21 जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 47 हजार 160 सभासद आहेत. त्यात सर्वाधिक कऱ्हाड, वाळवा तालुक्यात सभासद आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. उद्या (बुधवारी) शासकीय सुट्टी आहे. त्यामुळ गुरूवार व शुक्रवार तर त्यानंतर सोमवार व मंगळवार असे मोजकेच चार दिवस अर्ज भरण्याचे दिवस आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसांपासूनच उमेदावारी अर्ज दाखल व त्याची विक्री सुरू झाली आहे.

पहिल्याच दिवशी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांनी वडगाव हवेली-दुशेरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या गटातच कुसूरच्या विश्वास शिंदे, विंगच्या तानाजी खबाले आणि कोडोलीचे गजानन जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय अन्य दोन उमेदवारी अर्जही दाखल आहेत. त्यात रेठरे बुद्रुक-शेणोली गटातून रेठरे बुद्रुकचे महेश कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अन्य एक अर्ज रेठरे हरणाक्ष - बोरगाव गटातून दाखल झाला आहे. तो बहे गावचे संतोष दमामे यांनी दाखल केला आहे.

कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर; 29 जूनला होणार मतदान

Six Candidates Filed Their Nomination On The First Day For Krishna Factory Election