जानाई- मळाईच्या पायथ्याला मानवी कवटी सापडली

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 14 January 2021

स्थानिक नागरिकांनी काेणत्याही अफवेस बळी पडू नये असे आवाहन शहर पाेलिसांनी केले आहे.

सातारा : चंदननगर (कोडोली) येथील जानाई- मळाईच्या पायथ्याला मानवी कवटी आढळून आली आहे. परिसरातील भटक्‍या कुत्र्याने ही कवटी तोंडातून ओढून आणत एका घरासमोरच टाकल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी ही कवटी ताब्यात घेतली असून, अधिक तपासणीसाठी ती सातारा येथे जिल्हा रुग्णालय, तसेच पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकाराची चर्चा नजीकच्या गावांमध्ये पसरली. त्यामुळे नागिरकांमध्ये घबराहाट निर्माण झाली. 

चिकन वाटल्याने गुन्हा दाखल झाला ना भाऊ!

स्थानिक नागरिकांनी काेणत्याही अफवेस बळी पडू नये असे आवाहन शहर पाेलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Skull Found Near Janai Malai Satara Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: