तेवढं 'एनएचफाेर'चे खड्डे शेणाने भरा; वैदिक पेंटवरुन नितीन गडकरींना आवाहन

तेवढं 'एनएचफाेर'चे खड्डे शेणाने भरा; वैदिक पेंटवरुन नितीन गडकरींना आवाहन
Updated on

सातारा : समाज माध्यमांवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर चर्चा रंगते, त्यातून वाद होतात तसेच व्यक्तींना ट्रोल करण्याचे प्रकार होत असतात. सध्या चर्चेत असलेली बाब म्हणजे 'वैदिक पेंट'. वास्तविक, सरकारने अलीकडेच जाहीर केले होते की शेण-निर्मित 'वैदिक पेंट' लवकरच देशात सुरू होणार आहे. यासंदर्भात घोषणा होताच समाज माध्यमांतील वापरकर्ते जागृत झाले. त्याविषयी सक्रियतेने बोलू लागले. त्यातून देशाचे केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरींवर टीका होऊ लागली आहे. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने 'खादी व ग्रामोद्योग आयोग' च्या माध्यमातून वैदिक पेंट सुरू करणार आहे. यातून शेतक-यांना जास्तीचे उत्पन्न मिळेल असा सरकारचा दावा आहे. डिस्टेम्पर आणि इमल्शनमध्ये येणारा हा पेंट इको फ्रेंडली, नॉन टॉक्‍सिक, अँटी बॅक्‍टेरियल, अँटी फंगल आणि वॉशेबल असेल आणि अवघ्या चार तासांत कोरडे होईल, असाही दावा सरकारने केला वैदिक पेंटच्या विषयी केला आहे. वैदिक पेंटच्या सहाय्याने पशुधन पाळणाऱ्या शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 55 हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

'रयत'च्या डॉ. भाऊसाहेब कराळे, डॉ. अरविंद बुरुंगलेंचा राजीनामा
 

या वैदिक पेंटविषयीच्या माहितीचे ट्‌विट देशाचे केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्यांच्या ट्‌विटला सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यात काहींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विशेषतः पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न मांडून मंत्री गडकरींचे लक्ष वेधले आहे.

Video : सावधान! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता खचला

श्रीधर व्ही कांबळे नाम नावाची व्यक्ती लिहिते, 'ते, पुणे - सातारा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी (एनएच 4) गोबर वापरा. ते राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काम करणार नाही असे दिसते. दरम्यान बऱ्याच वापरकर्त्यांनी वैदिक पेंटशी संबंधित घोषणेस पाठिंबाही दर्शविला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Heartbreaking farewell to brave soldier Arjun Jadhav in rural Maharashtra village
Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill
Satara Mahimangad Fort conservation project
Rural Youth’s Inspiring Journey: Harsh Indalkar Joins the Indian Air Force
Marathi News Esakal
www.esakal.com