Maharashtra Hind Kesari: सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता, विजयला अश्रू अनावर..

Hind Kesari final Mahendra vs Prithviraj: सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने थरारक अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात करत ‘हिंद केसरी’ किताबासह थार व चांदीची गदा पटकावली; दुखापतीमुळे पृथ्वीराजची माघार, विजय चौधरीचा पराभव आणि अश्रूंनी भरलेला भावनिक क्षण
Mahendra Crowned Hind Kesari as Pune’s Prithviraj Finishes Runner-Up

Mahendra Crowned Hind Kesari as Pune’s Prithviraj Finishes Runner-Up

sakal

Updated on

-अशोक निंबाळकर

सातारा: रात्री उशिरा झालेल्‍या ५२ व्‍या हिंद केसरी कुस्‍ती स्‍पर्धेत सोलापूरचा महेंद्र गायकवाड ऊर्फ बाहुबली ‘हिंद केसरी’ ठरला. त्याने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात केली. पृथ्वीराजला दुखापत झाल्याने त्याने माघार घेतल्‍यावर महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले. महेंद्रला महाराष्ट्र केसरीने तब्बल तीनदा हुलकावणी दिली होती. मात्र, यंदाच्या (२०२४-२५) हिंद केसरीच्या गदेवर त्याने नाव कोरले. मोहोळचे महाराष्ट्र केसरीसह हिंद केसरी होण्याचे स्वप्न भंगले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com