Shikhar Shingnapur Car Accident
Shikhar Shingnapur Car Accidentesakal

400 फूट दरीत कार कोसळून माय-लेकाचा अंत; भवानी घाटात भीषण अपघात

Published on
Summary

शिंगणापूर घाटात चार चाकी कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाले आहेत.

शिखर शिंगणापूर : शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील (Shinganapur-Natepute Route) भवानी घाटात आज सकाळी कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात थदाळे (ता. माण) येथील मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गजानन सर्जेराव वावरे (वय ५८), हिराबाई सर्जेराव वावरे (वय ७५) अशी मृतांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, थदाळे (ता. माण) येथील मूळ गाव असलेले गजानन वावरे हे नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस होते. ते कुटुंबीयांसमवेत नाशिकमध्ये (Nashik) वास्तव्यास होते. काल (ता. १३) थदाळे विकास सेवा सोसायटीची निवडणूक असल्याने गजानन वावरे हे आईसमवेत सोसायटीच्या मतदानासाठी थदाळे गावी आले होते. आज सकाळी गजानन हे त्यांची वृद्ध आई हिराबाई यांच्यासमवेत थदाळेहून कारने (एमएच १५ जीएल ९०४०) नाशिककडे निघाले होते. शिंगणापूर- नातेपुते मार्गावरील भवानी घाटातून जाताना वावरे यांचा ताबा सुटल्याने कार सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता, की कार डोंगराच्या दोन टप्प्यावर आदळून खोल दरीमध्ये कोसळली. त्यामध्ये गजानन व हिराबाई वावरे या मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

Shikhar Shingnapur Car Accident
विधानपरिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप; 'महाविकास'ला धक्का

दरम्यान, मायलेकरांचा अपघाती मृत्यू झाल्याने थदाळे गावावर शोककळा पसरली आहे. गजानन वावरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या अपघाताची नोंद नातेपुते पोलिस ठाण्यात झाली असून, नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेपुते पोलिस तपास करत आहेत.

Shikhar Shingnapur Car Accident
गायींच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवा, साध्वींचं वादग्रस्त विधान

साहसी युवकांचा मदतकार्यात सहभाग

अपघाताची माहिती समजताच शिंगणापूर व पिंपरी येथील ३० ते ४० साहसी युवक मदतकार्यासाठी अपघातस्थळी पोचले. वीरभद्र कावडे, शंकर तांबवे, आनंद बडवे, अनिल कर्चे, मिथुन कर्चे, अक्षय शेंडे, अमोल राऊत, धनंजय कावडे, विकास मदने, विशाल कर्चे या साहसी युवकांनी खोल दरीत उतरून दोन्ही मृतदेह चादरीमध्ये ठेऊन दोरखंड व मानवी साखळीच्या मदतीने दरीतून वर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com