Avdhoot Deshmane
sakal
कोरेगाव - पोलिस उपनिरीक्षक आणि चित्रकार संजय देशमाने यांच्याकडून चित्रकलेची प्रेरणा घेऊन त्यांचा इयत्ता बारावीत शिकत असलेला मुलगा अवधूत देशमाने याने कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता सराव व चिकाटीने चित्रकलेची कला जोपासली आहे. त्याने आतापर्यंत अनेक मान्यवरांची रेखाचित्रे तथा पोर्ट्रेट हुबेहूब साकारली आहेत. त्याच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.