Sonia Farande success story
esakal
आनेवाडी : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आनेवाडी गावच्या कन्या सोनिया संजय फरांदे यांनी आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांची सहायक नगर रचनाकार, श्रेणी-१ (गट-ब, राजपत्रित) या पदावर नियुक्ती केली (Sonia Farande Assistant Town Planner appointment) आहे. त्यांच्या नियुक्तीने आनेवाडी गावासह जावळी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.