
सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी यापुढे आपण स्वतः अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
कुडाळ (जि. सातारा) ः पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी येथे बुधवारी मध्यवर्ती ठिकाणी दारूअड्ड्यावर पोलिसांसमवेत छापा टाकून संशयिताकडून सुमारे चार हजार रुपयांची दारू पोलिसांना जप्त करण्यास भाग पाडले. आजपर्यंत अवैध धंदेवाले दहशत माजवून गावात राजरोसपणे धंदे करीत होते; परंतु सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आता स्वतः लक्ष घालून अवैध धंदे मुळासकट उद्ध्वस्त करणार असल्याचे सौरभ शिंदे यांनी सांगितले.
येथील कुडाळ- मेढा मुख्य रस्त्याच्या बाजूलाच दारूचा अवैध व्यवसाय पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे सुरू होता. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी आपणाकडे आल्या होत्या. पोलिसांकडून केली जाणारी कारवाई केवळ दिखाऊ आणि तकलादू असल्याने हे धंदे पुन्हा लगेच सुरू होत आहेत. अवैध धंद्यांचा विळखा गावाला पडला आहे. यामध्ये अनेक कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी यापुढे आपण स्वतः अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दारूअड्ड्यावर पोलिसांना बरोबर घेऊन श्री. शिंदे यांनी स्वतः छापा टाकला. या वेळी पोलिसांनी दारूच्या बाटल्यांचा अंदाजे चार हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून प्रवीण रामचंद्र वारागडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पाहा व्हिडीओ : गावच्या सर्वांगीण विकासासाठी गट- तट विसरून झाली सरपंच निवड
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठरलं
गावक-यांनाे सावधान! मराठवाडी धरणातून आज सोडणार पाणी
गोपीचंद पडळकरांचे बाेलणे हा निव्वळ पोरकटपणा : जयंत पाटील
स्वामी विवेकानंद संस्थेची ती शाळा पाडण्याचे ब्राह्म समाजाकडून स्पष्टीकरण
Edited By : Siddharth Latkar