हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : खरीप हंगामात टप्प्याटप्प्याने पाऊस झाल्याने सोयाबीनचा उतारा चांगला मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. ज्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी केली होती, त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीस आणण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा लावला आहे. हमीभावाने खरेदीची केंद्रे सुरू नसल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. 

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील काही तालुक्‍यातील विभागांचा अपवाद वगळता सोयाबीनला पोषक पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीनही चांगले तरारून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे चांगले मिळतील, अशी आशा आहे. ज्या शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली, त्यांचे सोयाबीन काढणी सुरू आहे, तर काहींची काढणी झाली आहे. त्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी बाजारपेठेत सोयाबीन विक्रीस आणण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा लावला आहे. 

यंदाच्या हंगामासाठी केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटलला तीन हजार 880 रुपये जाहीर केला आहे. हमीभावाने खरेदीची केंद्रे 15 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची नोंदणीची कार्यवाही एक ऑक्‍टोबरपासून खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेत सोयाबीन विक्रीस आणले आहे, त्या शेतकऱ्यांची काही व्यापाऱ्यांकडून त्यातील मॉश्‍चर कमी असल्याचे सांगून कमी दराने खरेदीचा सपाटा सुरू आहे. शेतकऱ्यांना मॉश्‍चरमधील जास्त माहिती नाही. त्याचा फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची कमी दराने खरेदी सुरू आहे. त्यातच हमीभावाने खरेदीची केंद्रे सुरू नाहीत. त्याचा फायदा उठवत काही शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. 

शेतकऱ्यांनो, थोडे दिवस थांबा..

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आहे, त्यांनी त्याच्या विक्रीसाठी थोडं थांबलेलच बरं होणार आहे. कारण, 15 ऑक्‍टोबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अवघ्या नऊच दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वी सोयाबीनची विक्री करून तोटा करून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी थोडे थांबल्यास त्यांना चार पैसे जादा मिळण्याचीही हमी आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sugar Mill Opening
women hockey gold medal
udaysinh patil undalkar
Sangli District Bank Election
Marathi News Esakal
www.esakal.com