
आरळे : येथून दुचाकी चोरी करणाऱ्यास अवघ्या चार तासांत तालुका पोलिसांनी अटक केली आहे. रामचंद्र विश्वास जाधव (रा. डोळेगाव, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. शनिवारी (ता. २२) आरळे येथील स्मशान भूमीजवळून सचिन बबन चव्हाण (रा. आरळे) यांची दुचाकी चोरीला गेली होती.