Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

राज्यात कुस्ती संघटनांमधील वादामुळे वेगवेगळ्या राज्यस्तरीय कुस्ती संघटनांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.
dattatray bharane and chandrahar patil

dattatray bharane and chandrahar patil

sakal

Updated on

कऱ्हाड - एक राज्य, एक संघटना, एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा या मागणीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील पैलवांनी आज आंदोलन केले.

क्रीडामंत्री दतात्रय भरणे यांनी आज संबंधितांशी चर्चा करुन पुढील आठवड्यात त्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे ते आंदोलन स्थगीत करण्यात आल्याचे हिंदकेसरी वेताळ यांनी सांगीतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com