Frogmouth Bird : परदेशी गिधाडानंतर 'सह्याद्री'त श्रीलंकन फ्रॉग माउथचं दर्शन

Sri Lankan Frogmouth Bird
Sri Lankan Frogmouth Birdesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (Sri Lankan Frogmouth Bird) म्हणजे बेडूक तोंड्या पक्ष्याचे दर्शन झाले. कोयनेच्या घनदाट जंगलात हा निशाचर पक्षी स्थानिक पक्षी निरीक्षकांना दिसला आहे. (Sri Lankan Frogmouth Bird Found In Sahyadri Tiger Project Satara Marathi News)

Summary

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ श्रीलंकन फ्रॉग माउथ म्हणजे बेडूक तोंड्या पक्ष्याचे दर्शन झाले.

डिस्कव्हर कोयना आणि सह्याद्री सोशल फाउंडेशन संस्थेच्या संग्राम कांबळे, निखिल मोहिते, महेश शेलार, संकेत मोहिते, नरेश शेलार, सागर जाधव, क्षितीज कांबळे, स्वप्नील पाटील व कृणाल कांबळे यांनी त्याची नोंद घेतली आहे. त्यांनी पक्ष्यांची छायाचित्रे व माहिती वन खात्यालाही दिली आहे. श्रीलंकन फ्रॉग माउथचे दर्शन झाल्याचे स्थानिक युवकांनी कळवले आहे. वनविभागही त्याचा शोध घेत आहे, असे कोयनेचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी स्पष्ट केले.

कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary) आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानिकांच्या मदतीने संशोधन करत आहेत. स्थानिक युवकांनी एकत्रत येत डिस्कवर कोयना आणि सह्याद्री सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. त्यातून जंगल, पक्ष्यांचे ते निरीक्षण, संशोधन करत आहेत. पक्षी निरीक्षणावेळी सहसा नजरेत न पडणारा दुर्मीळ श्रीलंकन फ्रॉग माउथ ऊर्फ बेडूक तोंड्या पक्षी त्या युवकांच्या नजरेस पडला आहे. तो पक्षी दुर्मीळ आहे. त्यामुळे त्यांनी ती नोंद घेऊन वन विभागाला माहिती कळवली आहे. सह्याद्री व्याघ्रच्या कोयना परिसरातील तो पक्षी दुर्मीळ आहे.

Sri Lankan Frogmouth Bird
अन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद

काय आहे श्रीलंकन फ्रॉग माउथ

श्रीलंकन फ्रॉग माउथ पक्षी निशाचर आहे. बॅटरॅकहोस्टोमाउस मोनिलिंगर त्याचे शास्त्रीय नाव आहे. त्याच्या शरीराची लांबी 23 सेंटीमीटर आहे. कीटक त्याचे खाद्य आहे. नर पक्ष्याचा रंग राखाडी, तर मादीचा रंग बदामी असतो. पंखाच्या बाजूने व मागे बदामी रंगावर पांढरे ठिपके असतात. बेडकासारखे तोंड असल्याने त्याला मराठीत बेडूक तोंड्या म्हणतात.

Sri Lankan Frogmouth Bird Found In Sahyadri Tiger Project Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com