Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

शरीराने साथ दिली नाही... चालता येत नाही, बोलताही येत नाही... मात्र जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर.....
Shivprasad Chimpanti

Shivprasad Chimpanti

sakal

Updated on

खंडाळा - शरीराने साथ दिली नाही... चालता येत नाही, बोलताही येत नाही... मात्र जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शिवप्रसाद चम्पांती याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ६६ टक्के गुण मिळवत यशाची प्रेरणादायी गाथा लिहिली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही लेखनिकाची मदत न घेता त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर हे यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com