वेतन न मिळाल्याने साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

वेतन न मिळाल्याने साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सातारा : कोरोना कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावत परप्रांतियांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्याचे काम केले आहे. या कालावधीत केलेल्या कामाचे वेतन थकीत असून, ते मिळण्यासाठी शुक्रवारी येथे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन एसटी महामंडळास सादर केले आहे. 

याप्रसंगी शिवाजीराव देशमुख, ज्ञानेश्‍वर घोणे, आर. आर. जाधव, प्रकाश पाटील, लाहुताई मडके, महेंद्र साळुंखे तसेच एसटी चालक व इतर कर्मचारी उपस्थित होते. लॉकडाउन कालावधीत अडकून पडलेल्या परप्रांतियांना नेऊन सोडणे, मुंबई येथील रेड झोनमधील सेवा सुरळीत ठेवणे तसेच इतर कोरोनाविषयक प्रत्येक उपक्रमात एसटी कर्मचाऱ्यांनी तळमळीने योगदान दिले आहे.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीपैकी जुलै महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. उर्वरित दोन महिन्यांचे वेतन अद्यापही एसटी चालक व इतर कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. हे वेतन मिळण्याकरिता केलेल्या पत्रव्यवहारास प्रतिसाद न मिळाल्याने आज आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाची दखल घेत तत्काळ थकीत वेतन कर्मचाऱ्यांना देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com