Satara : कराडमध्ये सरकारचे तेरावा घालत एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कराडमध्ये सरकारचे तेरावा घालत एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध

कराडमध्ये सरकारचे तेरावा घालत एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध

कराड : एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथील एसटी कर्मचाऱ्यांनीही आगाराच्या प्रवेशव्दारावर आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्यावतीने आज सोमवारी राज्य सरकारचा तेरावा घालून निषेध नोंदवण्यात आला. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही. आज सरकारचा तेरावा घालत आहोत. पुढे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारची अंतयात्रा काढू, असा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण व्हावे या मागणीसाठी अनेक दिवसापासुन आंदोलन सुरु केले आहे. त्याअंतर्गत येथील एसटी आगारासमोर सर्व संघटनांचे कर्मचारी एकत्र येवुन त्यांनी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर ठिय्या मारला आहे. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे एकही एसटीबस सुरु नाही. दरम्यान आज एसटी आमच्या घामाची, नाही कुणाच्या बापाची... कोण म्हणतो देत न्हाय, घेतल्याशिवाय रहात नाय..., एसटीचे राज्य शासनात विलगीकरण, झालेच पाहिजे या ना अशा घोषणा देत आगारासमोर कर्मचाऱ्यांच्यावतीने अनोख्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकावर टीका केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारचा तेरावा घालून निषेध नोंदवण्यात आला. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही. आज सरकारचा तेरावा घालत आहोत. यापुढे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारची अंतयात्रा काढू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटिसा देण्यात येत आहेत. परिवहनमंत्री हि नुसते चॉकलेट, गोळ्या बिस्किटाबद्दल बोलत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर प्रसंगी सरकारची अंतयात्रा काढणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

loading image
go to top