
बिजवडी : ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संकल्पना राबवून या खात्याचे नाव उंचावण्यावर भर देणार आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार असल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.