साउंड, लाइट, जनरेटर संघटनेचे खासदारांना साकडे!

सचिन शिंदे
Sunday, 11 October 2020

कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूक उद्योग सहा महिने बंद आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरातील साउंड, लाइट, जनरेटर, मंडप व्यावसायिक सभासद, कामगारांचा व्यवसाय ठप्प आहे. भविष्यात हा व्यवसाय कधी सुरू होईल, याची शाश्वती नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : लॉकडाउनपासून साउंड, लाइट आणि जनरेटरचा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे व्यावसायिक व कामगार यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून या व्यावसायिक व कामगारांना मदत व्हावी, अशी मागणी कऱ्हाड साउंड, लाइट आणि जनरेटर संघटनेने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. 

असिफ मुलाणी, अमोल गुरव, प्रीतम तांबे, राजेश भावके, राम घायाळ, ओंकार पवार यांनी हे निवेदन दिले. कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूक उद्योग सहा महिने बंद आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरातील साउंड, लाइट, जनरेटर, मंडप व्यावसायिक सभासद, कामगारांचा व्यवसाय ठप्प आहे. 

जिल्हाधिकारी शेखर सिंहंच्या प्रयत्नांना ठाकरे सरकारचे पाठबळ

भविष्यात हा व्यवसाय कधी सुरू होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे व्यावसायिकांचे बॅंक, पतसंस्थांचे कर्ज थकीत आहे. घरगुती खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, गोडाउनचे भाडे आदींमुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती बिकट आहे. व्यावसायिक व कामगारांसाठी शासनाने लक्ष घालून मदतीचा हात द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement Of Generator Association To MP Srinivas Patil At Karad Satara News